पहिल्याच पावसात नांदेड महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार उघड
नांदेड, 08 जून (हिं.स.)नांदेड शहरात पहिल्याच पावसाने हजेरी लावताच नांदेड महानगरपालिका प्रशासनाची कार्यप्रणाली आणि पूर्वतयारी किती ''तत्पर'' आहे, याचे जाहीर प्रदर्शन घडले आहे. पहिल्याच पावसाने पालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली असून शहरात
पहिल्याच पावसात नांदेड महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार उघड


नांदेड, 08 जून (हिं.स.)नांदेड शहरात पहिल्याच पावसाने हजेरी लावताच नांदेड महानगरपालिका प्रशासनाची कार्यप्रणाली आणि पूर्वतयारी किती 'तत्पर' आहे, याचे जाहीर प्रदर्शन घडले आहे. पहिल्याच पावसाने पालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली असून शहरात सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील कला मंदिर मुख्य रस्त्यासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. रस्त्यावरील ड्रेनेज चेंबर्सची झाकणे तुटलेली आणि उघडी पडली आहेत. रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून नाल्यांवर झाकण नसल्यामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नाल्यांमधील कचरा वेळेवर न काढल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवर, दुकानांमध्ये आणि स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये शिरले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande