उपमुख्यमंत्री शिंदे यांची खा. अशोक चव्हाण यांनी घेतली भेट
नांदेड, 09 जून (हिं.स.)। आज शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण आणि नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी सदिच्छा
Q


नांदेड, 09 जून (हिं.स.)। आज शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण आणि नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या सदिच्छा भेटीदरम्यान आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत, तसेच नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

महायुतीतील सर्व घटक पक्षांची भक्कम ताकद, कार्यकर्त्यांचे अहोरात्र परिश्रम आणि ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यांच्या बळावर या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागेवर ऐतिहासिक आणि भव्य विजय संपादन करेल, असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाम विश्वास व्यक्त केला.

याचवेळी नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार अमरनाथ राजुरकर यांना अग्रिम शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande