गेवराई बसस्थानक परिसरात नो पार्किंग झोन सुरू
बीड, 09 जून (हिं.स.)। गेवराई येथील बसस्थानक परिसरात २०० मीटर नो पार्किंग झोन सुरू करण्यात आला असून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यातील बसस्थानकांचे २०० मीटर पर
गेवराई बसस्थानक परिसरात नो पार्किंग झोन सुरू


बीड, 09 जून (हिं.स.)। गेवराई येथील बसस्थानक परिसरात २०० मीटर नो पार्किंग झोन सुरू करण्यात आला असून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यातील बसस्थानकांचे २०० मीटर परिसरात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश परिवहन यांनी दिले आहेत.

या मोहिमेअंतर्गत १५ जून २०२६ दरम्यान संयुक्त अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशावरून ही मोहीम हाती घेतली आहे. बसस्थानक परिसरात गर्दी व वाहतूककोंडी लक्षात घेता या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. या मोहिमेत विभागीय वाहतूक अधिकारी, आगारप्रमुख तसेच सुरक्षा व दक्षता विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

-------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande