
छत्रपती संभाजीनगर, 09 जून, (हिं.स.)। उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक -२०२६ करिता येत्या १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ दुपारी ४ वाजतापर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण ९८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.यामध्ये ४९९ पुरुष आणि ४८९ स्त्री मतदारांचा समावेश आहे.यामध्ये धाराशिव जिल्हा परिषदेचे २७ पुरुष ३६ स्त्री असे एकूण ६३ मतदार, जिल्ह्यातील दोन नगरपंचायत व आठ नगरपालिकांचे १३७ पुरुष आणि ११७ स्त्री असे एकूण २५४ मतदार,लातूर जिल्हा परिषदेचे ३२ पुरुष आणि ३७ स्त्री मतदार असे एकूण ६९ मतदार,पाच नगरपंचायत चार नगरपालिकांचे ११२ पुरुष,१०९ स्त्री,लातूर महानगरपालिकेचे ४१ पुरुष,३६ स्त्री असे ७७ मतदार,बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायत व सहा नगरपालिकांचे १५० पुरुष आणि १५४ स्त्री मतदार असे एकूण ३०४ मतदार यांचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यात ८,लातूर जिल्ह्यात १० आणि बीड जिल्ह्यात ११ अशा एकूण २९ मतदान केंद्रावर मतदार होणार आहे.सर्व २९ मतदान केंद्र हे तहसील कार्यालय येथे असणार आहे.
या निवडणुकीसाठी धाराशिव येथील ९ मतदान केंद्राध्यक्ष व ३६ इतर मतदान अधिकारी,लातूर येथे ११ मतदान केंद्राध्यक्ष व ४४ इतर मतदान अधिकारी आणि बीड येथे १२ मतदान केंद्राध्यक्ष व ४८ इतर मतदान अधिकारी राहतील. यामध्ये राखीव इतर मतदान अधिकारी यांचा समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यात चार,लातूर जिल्ह्यात पाच आणि बीड जिल्ह्यात पाच एकूण १४ झोनल अधिकारी असतील.संबंधित जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी हेच झोनल अधिकारी म्हणून काम पाहतील.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis