
परभणी, 09 जून (हिं.स.) : परभणी ते गंगाखेड या मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या इंधन टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच. 44 ए.जे. 7477 क्रमांकाचा इंधन टँकर परभणीकडून गंगाखेडच्या दिशेने जात असताना त्याने एम.एच. 14 ई.टी. 6331 क्रमांकाच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दिगंबर कदम यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली असता टँकर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे समोर आले.
या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात माणिक आप्पाराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis