परभणीत 16 बेवारस दुचाकींचा जाहीर लिलाव 13 जून रोजी
परभणी, 09 जून (हिं.स.) : पोलीस स्टेशन कोतवाली, परभणी यांच्या हद्दीत बेवारस अवस्थेत मिळून आलेल्या तसेच जप्त करण्यात आलेल्या एकूण 16 दुचाकी मोटारसायकलींचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. हा लिलाव शनिवार, 13 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता पोलीस
परभणीत 16 बेवारस दुचाकींचा जाहीर लिलाव 13 जून रोजी


परभणी, 09 जून (हिं.स.) : पोलीस स्टेशन कोतवाली, परभणी यांच्या हद्दीत बेवारस अवस्थेत मिळून आलेल्या तसेच जप्त करण्यात आलेल्या एकूण 16 दुचाकी मोटारसायकलींचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

हा लिलाव शनिवार, 13 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता पोलीस स्टेशन कोतवाली, परभणी येथे होणार आहे. या लिलावात इच्छुक नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.लिलाव प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहितीसाठी नागरिकांनी पोलीस स्टेशन कोतवाली, परभणी येथे संपर्क साधावा, असे पोलीस निरीक्षक संजय निकुंभ यांनी कळविले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande