
लातूर, 09 जून (हिं.स.) येत्या १५ जून रोजी राज्यभरातील शाळा सुरु होणार आहेत. नवा वर्ग, नवे साहित्य आणि नवीन अॅडमिश यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सध्या सुरु झाली आहे. शहरातील काही शाळांमधून अतिरिक्त फीस आणि शैक्षणिक साहित्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी अतिरिक्त फीस किंवा शैक्षणिक साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष आठ दिवसांनंतर सुरु होणार आहे. त्यानिमित्त बाजारात कृमिक पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, आले आहेत. बालवाडी ते पहिली आणि पुढे आपल्या पाल्यांना प्रवेश देण्यासाठी शाळांमध्ये गर्दी करीत आहेत. त्याचाच फायदा घेत कांही
शिक्षण संस्था व शाळा पालकांकडून अधिकची फीस वसुलण्यासाठी प्रयत्न करतात, तसेच वह्या, पुस्तके, गणवेश किंवा शूज, असे शैक्षणिक साहित्य शाळामधूनच खरेदी करावेत किंवा ठराविक दुकानातूनच घेण्याची सक्ती देखील करीत आहेत. त्यामुळे पालकांची अडचण होत आहे.
काही पालकांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे या गोष्टीची तक्रार केली होती. त्याची दखल घेत शिक्षणाधिकारी अंधारे यांनी अतिरिक्त फीस किंवा शैक्षणिक साहित्यासाठी सक्ती करणाऱ्या शाळांवर थेट कारवाईचा ईशारा दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis