
बीड, 09 जून (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक, युद्ध विधवा आणि विधवांच्या पाल्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षात वसतीगृहात प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.
बीड व अंबाजोगाई येथील सैनिकी मुलांच्या वसतीगृहात प्रवेशासाठी पात्र व इच्छुकांनी ता. ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. सदर प्रवेश प्राधान्यक्रमानुसार असून पदानुसार अल्प शुल्कात निवासाची सोय असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉडून लीडर विद्यासागर कोरडे (निवृत्त) यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, विधवांच्या मुलांना या वसतीगृहामध्ये पूर्णपणे विनामूल्य प्रवेश असेल. तसेच जागेच्या उपलब्धतेनुसार इतर नागरिक पाल्यांचाही प्रवेशासाठी विचार केला जाईल. प्रवेशासाठी लागणारी प्रवेश पुस्तिका संबंधित वसतीगृह अधीक्षकांकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis