
सोलापूर, 09 जून (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्यातील सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या व 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार विशेष ग्रामसभा बोलावून, तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत 12 जून 2026 या कालावधीत काढण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमानुसार अक्कलकोट तालुक्यातील एकूण 76 ग्रामपंचायतीचा आरक्षण सोडत कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे.
आरक्षण सोडतीसाठी नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीचे नांव तेथील अधिकारी व कर्मचारी यांचे नाव व पदनाम व विशेष ग्रामसभा बोलावून आरक्षण सोडत काढावयाची तारीख व वेळ पुढीलप्रमाणे, 10 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता उमरगे व दुपारी 2 वाजता निमगांव, दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता गळोरगी व दुपारी 2 वाजता गौडगांव खु, दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता बासलेगांव व दुपारी 2 वाजता समर्थनगर.मंडळ अधिकारी वागदरी भासगी आर एस– सकाळी 10 वाजता वागदरी व दुपारी 2 वाजता साफळे, दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता खैराट व दुपारी 2 वाजता भुरीकवठे, दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता गोगांव व दुपारी 2 वाजता बादोले बु, दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता सांगवी बु / हिंगणी / कोळेकरवाडी व दुपारी 2 वाजता सांगवी खु/ममदाबाद/कोळीबोट. दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता किणीवाडी व दुपारी 2 वाजता कुरनूर, दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता मोटयाळ व दुपारी 2 वाजता सिंदखेड, दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता किरनळ्ळी व दुपारी 2 वाजता गांव चुंगी. अशी माहिती तहसिलदार अक्कलकोट विनायक मगर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड