लातूर - जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात घट; १ हजार मुलांमागे केवळ ९२७ मुली
लातूर, 09 जून (हिं.स.)। जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला जन्मलेल्या बालकांच्या संख्येवरुन जिल्ह्याची लिंगगुणोत्तर प्रमाण काढले जाते. नुकताच लिंगगुणोत्तर प्रमाण काढण्यात आले. त्यात १ हजार मुलांमागे मुलींची संख्या ९२७ वर आली आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्म
मुलींचा जन्मदर


लातूर, 09 जून (हिं.स.)। जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला जन्मलेल्या बालकांच्या संख्येवरुन जिल्ह्याची लिंगगुणोत्तर प्रमाण काढले जाते. नुकताच लिंगगुणोत्तर प्रमाण काढण्यात आले. त्यात १ हजार मुलांमागे मुलींची संख्या ९२७ वर आली आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात चिंताजनक घट झाली आहे. मुलींची घटती संख्या धोक्याच्या वळणावर आहे. वंशाचा दिवा मुलगाच हवा ही मानसिकता अद्यापही कायम असल्याचेच या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी विविध शासकीय योजना आणि जनजागृती सुरु असली तरी, लिंगगुणोत्तरात होणारी घसरण थांबलेली नाही, थांबवता आलेली नाही. आईपण मिळवताना महिला मृत्यूशी झुंज देतात. कुटूंब सावरण्यात तिचे योगदान सर्वाधिक असते. तरीही समाजात स्त्री-पुरुष असा भेदभाव होत असून मुलगी नको, या मानसिकतेतून छुपे गर्भलिंग निदान व स्त्री भ्रुणहत्या होत असल्याचा संशय या आकडेवारीवरुन बळावतो. कायद्याने गर्भलिंग निदान हा अत्यंत गंभीर गुन्हा असला तरी, मुलींचा घटणारा टक्का हे समाजासमोरील मोठे आव्हान बनले.

जिल्ह्यात कळ्या खुडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे लिंगगुणोत्तर प्रमाणावरुन लक्षात आल्याने आता आरोग्य विभागानेही मोहीम हाती घेतली आहे. एक किंवा दोन मुलीनंतर गरोदर असलेल्या महिलांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. महिलांसह तिच्या कुटूंबियांचे सर्व बाजूने समुपदेशन करण्यात येत आहे.

आहे.

सीमावर्ती भागातील कर्नाटक राज्यात काही भागात बेकायदा गर्भलिंग निदान सुरु असल्याची चर्चा पुर्वीही होती ती आजही आहे. लिंगगुणोत्तर प्रमाण पाहिले तर या चर्चेत सत्य दडले आहे काय?, हे पाहणे महत्वाचे आहे. काहींही असले तरी त्याचा फटका मुलींची संख्या कमी होण्यात होत आहे. नुकतेच काढण्यात आलेल्या लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातून आरोग्य यंत्रणेला सूचक इशाराच ठरत आहे.

वंशाचा दिवा म्हणुन मुलाचा हट्ट धरणाऱ्या कुटुंबात एक किंवा दोन मुलींना जन्म देऊन तिसऱ्यांदा गरोदर राहिलेल्या महिलेवर मोठे दडपण असते. यातूनच महिला व कुटूंबाकडून माहिती लपवण्यात येते. अंगणवाडी तसेच आरोग्य केंद्रातून देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभघेतला जात नाही. यामुळे असुरक्षित बाळंतपण व अन्य कारणांनी माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढते.

खरे तर स्त्रीध्रुण हत्या बेकायदेशीर असताना वंशाला दिवा म्हणुन मुलगा व मुलगी समानच असल्याचे पटवून देण्यात येत असले तरी या स्थितीत मुलींची दिवसेंदिवस कमी होणारी संख्या वेळीच आटोक्यात न आल्यास पुन्हा ती नियंत्रणास येण्यासाठी बराच कालावधी लागेल. यामुळे आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande