रत्नागिरी : निखिल घाग यांच्या आगग्रस्त कुटुंबाला भाजपकडून मदतीचा हात
रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) ।शहरातील प्रभाग क्रमांक ११ झाडगाव येथील भारतीय जनता पार्टीचे बूथप्रमुख निखिल घाग यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले. आगग्रस्त कुटुंबाला भाजपतर्फे मदत करण्यात आली. आगीत घरातील संपूर्ण वायरिंग, फ्रिज, ट
रत्नागिरी : भाजप बूथ प्रमुख निखिल घाग यांच्या आगग्रस्त कुटुंबाला भाजपकडून मदतीचा हात*


रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) ।शहरातील प्रभाग क्रमांक ११ झाडगाव येथील भारतीय जनता पार्टीचे बूथप्रमुख निखिल घाग यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले. आगग्रस्त कुटुंबाला भाजपतर्फे मदत करण्यात आली.

आगीत घरातील संपूर्ण वायरिंग, फ्रिज, टीव्ही, पंखे, मिक्सर, बेड, अन्नधान्य तसेच इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले.

या घटनेची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांना देण्यात आली. घटनेची गंभीर दखल घेत त्यांच्या माध्यमातून तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात आली.

भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, नगरसेवक, बाबू सुर्वे, समीर तिवरेकर व सुप्रिया रसाळ यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वतीने प्राप्त झालेली मदत सदानंद रघुनाथ घाग यांना सुपूर्द करण्यात आली.

यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, शहराध्यक्ष दादा ढेकणे, ऋषिकेश केळकर, उपाध्यक्ष आशीष मोरे, शेखर लेले, भक्ती दळी, नीलेश आखाडे, प्रज्ञा टाकळे, नूपुरा मुळ्ये तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आगग्रस्त कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत सर्वांनी त्यांना धीर दिला

भारतीय जनता पार्टी संकटाच्या काळात आपल्या कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते याची प्रचीती यानिमित्ताने पुन्हा एकदा आली. भविष्यातही आवश्यक ती मदत व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande