बीड - चकलांबा ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध अभियानात अव्वल
बीड, 9 जून, (हिं.स.)। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत गेवराई तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळवून सर्वप्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गेवराईचे आ. विजयसिंह पंडित यांनी चकलांबा ग्रामपंचायत सरपंचाचे पत्र पाठवून विशेष अभिनंदन केले आहे. यासंदर्भात अभिन
बीड - चकलांबा ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध अभियानात अव्वल


बीड, 9 जून, (हिं.स.)। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत गेवराई तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळवून सर्वप्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गेवराईचे आ. विजयसिंह पंडित यांनी चकलांबा ग्रामपंचायत सरपंचाचे पत्र पाठवून विशेष अभिनंदन केले आहे. यासंदर्भात अभिनंदन पत्रात आमदार विजयसिंह पंडित यांनी म्हटले आहे, ग्रामपंचायतीच्या कामकाजात स्पर्धात्मक गुणवत्ता वाढविण्यासाठी महायुती सरकारने हे अभियान सुरू केले आहे.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे मोठे योगदान आहे. सुशासन व प्रशासन, सक्षम प्रशासन, पाणी व पर्यावरण व्यवस्थापन, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, डिजिटल सेवा, लोक सहभाग व आर्थिक नियोजन व महसूल वाढ, हे या अभियानातील प्रमुख घटक आहेत. या अभियानातून आदर्श ग्रामव्यवस्था निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आपल्या ग्रामपंचायतमध्ये केलेल्या विकासात्मक कार्याचा गौरव या माध्यमातून होत आहे. आपल्या कार्याची प्रेरणा नक्कीच ग्रामीण भागातील इतर ग्रामपंचायत सुद्धा घेणार आहेत. आपल्याला जिल्हा आणि राज्यस्तरावर पुरस्कारासाठी शुभेच्छा, असे पत्र देऊन सरपंच, ग्राम विकास अधिकारी आणि कार्यरत सदस्याचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande