डाक जीवन विमा दावा; वारसास 24.45 लाखांचा धनादेश सुपूर्द
परभणी, 09 जून (हिं.स.) : जिंतूर उपविभागांतर्गत मंठा (जि. जालना) येथील रहिवासी सचिन राठोड यांनी तीन वर्षांपूर्वी 20 लाख रुपयांचा डाक जीवन विमा घेतला होता. काही दिवसांपूर्वी त्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसास विमा दाव्याची रक्कम प्रदान
डाक जीवन विमा दावा; वारसास 24.45 लाखांचा धनादेश सुपूर्द


परभणी, 09 जून (हिं.स.) : जिंतूर उपविभागांतर्गत मंठा (जि. जालना) येथील रहिवासी सचिन राठोड यांनी तीन वर्षांपूर्वी 20 लाख रुपयांचा डाक जीवन विमा घेतला होता. काही दिवसांपूर्वी त्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसास विमा दाव्याची रक्कम प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमात त्यांच्या पत्नी सविता सचिन राठोड यांना टपाल विभागामार्फत 24 लाख 45 हजार 453 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश जिंतूर उपविभागीय निरीक्षक बालासाहेब आर. शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.

या प्रकरणात डाक निर्देशक अजिंक्य काळे (छत्रपती संभाजीनगर क्षेत्र) तसेच परभणी विभागाचे डाक अधीक्षक संजय आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय पोस्टमास्तर प्रकाश रुद्रावार, सचिन कदम व विकास अधिकारी यांनीही सहकार्य केले.

कार्यक्रमादरम्यान भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा योजनांची माहिती देण्यात आली. कमी हप्ता, अधिक बोनस, आयकर कायद्यातील कलम 80C अंतर्गत करसवलत, कर्ज सुविधा आणि पासबुक सुविधा यांसारखे विविध लाभ या योजनांमध्ये उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन परभणी डाक विभागाच्या वतीने करण्यात आले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande