नांदेड : हदगाव शहरात वृद्धाचा भरधाव एसटीच्या धडकेत मृत्यू
नांदेड, 09 जून (हिं.स.) : मासिक पेन्शन काढण्यासाठी गावावरून हदगाव शहरात आलेल्या ८० वर्षीय वृद्धाचा भरधाव एसटी बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना हदगाव बसस्थानक परिसरात घडली. उत्तमराव अंबाजी वाघमारे (वय ८०, रा. पेवा, ता. हदगाव) असे
नांदेड : हदगाव शहरात वृद्धाचा भरधाव एसटीच्या धडकेत मृत्यू


नांदेड, 09 जून (हिं.स.) : मासिक पेन्शन काढण्यासाठी गावावरून हदगाव शहरात आलेल्या ८० वर्षीय वृद्धाचा भरधाव एसटी बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना हदगाव बसस्थानक परिसरात घडली. उत्तमराव अंबाजी वाघमारे (वय ८०, रा. पेवा, ता. हदगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघमारे पेवा येथून एसटीने हदगाव येथे पेन्शनची रक्कम काढण्यासाठी आले होते. बसमधून उतरून ते बँकेकडे जाण्यासाठी बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पायी जात असताना हा अपघात घडला. यावेळी बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या भंडारा-लातूर मार्गावरील एसटी बसने (क्र. एमएच-१४ एमएच-२७४०) त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाघमारे रस्त्यावर कोसळले आणि गंभीर दुखापतीमुळे त्यांचा

घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर परिसरातील प्रवासी, ऑटोरिक्षा चालक आणि नागरिकांनी तातडीने धाव घेत बस थांबवली. जखमी अवस्थेतील वाघमारे यांना तत्काळ हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. जयशीला लांडगे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. मृत उत्तमराव वाघमारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पेवा गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, हदगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त एसटी बस ताब्यात घेण्यात आली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande