सेलूत बुधवारी शेतकरी मेळावा : पेरणीपूर्व व पेरणीनंतरच्या व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
परभणी, 09 जून, (हिं.स.)। सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन महाविद्यालयाच्या वतीने बुधवार 10 जून रोजी दुपारी 4 वाजता नूतन विद्यालयाच्या रा. ब. गिल्डा सभागृहात विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामजी भांगडिया यांच्य
सेलूत बुधवारी शेतकरी मेळावा : पेरणीपूर्व व पेरणीनंतरच्या व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन


परभणी, 09 जून, (हिं.स.)। सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन महाविद्यालयाच्या वतीने बुधवार 10 जून रोजी दुपारी 4 वाजता नूतन विद्यालयाच्या रा. ब. गिल्डा सभागृहात विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्यात ‘अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतकर्यांनी पेरणी व पेरणीनंतर घ्यावयाची काळजी’ या विषयावर तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधक डॉ. अरविंद पंडागळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया हे राहणार आहेत. मुख्य मार्गदर्शक म्हणून पेडगाव येथील प्रगतशील शेतकरी मंगेश देशमुख तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉ. गजानन गडदे उपस्थित राहून शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. व्ही. के. कोठेकर व सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक दत्तराव पावडे, डॉ. शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. आर. कंठाळे यांच्यासह महाविद्यालयाची संपूर्ण टीम परिश्रम घेत आहे. परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande