बीड - वादळी वाऱ्यामुळे शेतातील सौर पॅनेलचे नुकसान
बीड, 09 जून (हिं.स.)। येथील शेतकरी संकेत युवराज डोंगर यांच्या गट क्रमांक ३३ मधील शेतात बसविण्यात आलेले सीआरआय कंपनीचे पाच एचपी क्षमतेच्या पंपासाठीचे सौर पॅनेल जोरदार वाऱ्यामुळे उडून जाऊन त्याचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याचा वेग इतक
बीड - वादळी वाऱ्यामुळे शेतातील सौर पॅनेलचे नुकसान


बीड, 09 जून (हिं.स.)। येथील शेतकरी संकेत युवराज डोंगर यांच्या गट क्रमांक ३३ मधील शेतात बसविण्यात आलेले सीआरआय कंपनीचे पाच एचपी क्षमतेच्या पंपासाठीचे सौर पॅनेल जोरदार वाऱ्यामुळे उडून जाऊन त्याचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की सौर पॅनेलची रचना विस्कळीत झाली असून सौर पॅनेलचे मोठे नुकसान झाले.

या नुकसानीमुळे शेतातील तसेच पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून डोंगर यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. याशिवाय वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या शेतातील दोन ते तीन लिंबाची झाडेही उन्मळून पडली. नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अशा अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा फटका बसत असल्याने नुकसानग्रस्तांना तातडीने मदत व पंचनामा करण्याची मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande