पनवेल येथे मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू
रायगड, 09 जून (हिं.स.)। : सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, कळंबोली (पनवेल) येथे सन २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी मागासवर्गीय मुलींना मोफत प्रवेश देण्यात येणार असून इच्छुक विद्यार्थिनींनी निर्धा
Free admission process for backward class girls in government hostel begins in Panvel


रायगड, 09 जून (हिं.स.)। : सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, कळंबोली (पनवेल) येथे सन २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी मागासवर्गीय मुलींना मोफत प्रवेश देण्यात येणार असून इच्छुक विद्यार्थिनींनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल उषा शशिकांत गुजेला यांनी केले आहे.

ग्रीन पार्क सोसायटीसमोर, सेक्टर-१०, प्लॉट क्रमांक २१, कळंबोली येथे हे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. वसतिगृहामध्ये इयत्ता ८ वीपासून पुढील शिक्षण घेणाऱ्या गरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी अनुसूचित जातींना ८५ टक्के, अनुसूचित जमातींना ३ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींना ५ टक्के, आर्थिकदृष्ट्या मागास व इतर मागासवर्गीय दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थिनींना ५ टक्के तसेच विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

वसतिगृहात विद्यार्थिनींसाठी मोफत निवास, पौष्टिक नाश्ता, भोजन, अभ्यासासाठी आवश्यक वह्या-पुस्तके व लेखन साहित्य उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय दरमहा १,१५० रुपयांचा निर्वाहभत्ता, गणवेश भत्ता, रेनकोट व छत्री भत्ता, संगणक व ग्रंथालय सुविधा, क्रीडा साहित्य तसेच मनोरंजनाच्या विविध सुविधा पुरविण्यात येतात.

प्रवेशासाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील विद्यार्थिनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी, तर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

शालेय विद्यार्थिनींसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून इयत्ता ११ वी, १२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थिनींसाठी १५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, मागील वर्षाचे गुणपत्रक, आधार कार्ड, शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आणि रेशनकार्डच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे.

प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया HMAS पोर्टल वर सुरू करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी गृहपाल उषा शशिकांत गुजेला (मो. ८७६७३३९९७४) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande