पुणे - फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील तिन्ही रुग्णांना डिस्चार्ज
पुणे, 09 जून (हिं.स.)। फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात बाधित तीनही रुग्णांची प्रकृती आता पूर्णपणे सुधारली असून त्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार या स
पुणे - फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील तिन्ही रुग्णांना डिस्चार्ज


पुणे, 09 जून (हिं.स.)। फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात बाधित तीनही रुग्णांची प्रकृती आता पूर्णपणे सुधारली असून त्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार या सर्व रुग्णांवर संपूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले.

विषारी दारू सेवनामुळे गंभीर स्थितीत रुग्णांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होताच तज्ज्ञडॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करण्यात आले. तसेच आवश्यक वैद्यकीय चाचण्या, औषधोपचार आणि विशेषनिगा पुरविण्यात आली.

रुग्णांच्या नातेवाईकांनाही वेळोवेळी आवश्यकते सहकार्य व मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञडॉक्टर, प्रशिक्षित वैद्यकीयकर्मचारी आणि आवश्यक औषधोपचारयांच्या मदतीने रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.सदर रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत वायसीएम रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विभागातील अनुभवी डॉक्टरांनी रुग्णांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्षठेवत आवश्यक उपचार पद्धतींचा अवलंब केला. ज्यामुळे आता सर्वरुग्णांची प्रकृती स्थिर झाली असून ते पूर्ण पणे बरे होऊन निरोगी अवस्थेत घरी परतत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande