
सोलापूर, 09 जून (हिं.स.) सहकार विभागामार्फत मे 2025 मध्ये घेण्यात आलेल्या जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षा 2025 चे गुणपत्रक व प्रमाणपत्र मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर कार्यालयास प्राप्त झालेले आहेत.तरी संबंधित परीक्षार्थींनी आपले प्रमाणपत्र व गुणपत्रिका प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, 'ई-ब्लॉक', पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.परीक्षार्थींनी प्रमाणपत्र व गुणपत्रिका घेताना प्रवेशपत्र अथवा ओळखपत्र (आधारकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र इत्यादी) सोबत आणून सादर करावे, असे आवाहन, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर किरण गायकवाड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड