आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात १० जूनपासून बीड-मुंबई लॉंग मार्चची घोषणा
बीड, 09 जून (हिं.स.)। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यातील आंबेडकरी पक्ष व संघटनांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षण वाचवा, उपवर्गीकरण हटवा या मुख्य घोषणेसह येत्या १० जूनपासून बीड ते मुंबई असा ऐतिहासिक पायी लॉंग मा
आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात १० जूनपासून बीड-मुंबई लॉंग मार्चची घोषणा


बीड, 09 जून (हिं.स.)। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यातील आंबेडकरी पक्ष व संघटनांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षण वाचवा, उपवर्गीकरण हटवा या मुख्य घोषणेसह येत्या १० जूनपासून बीड ते मुंबई असा ऐतिहासिक पायी लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.

उपवर्गीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या बदर समितीचा अहवाल सरकारने तत्काळ सार्वजनिक करावा, अशी मागणी करत सरकार जनतेवर हा निर्णय लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच सूचना व हरकती सादर करण्याची मुदत ३० ऑगस्टपर्यंत वाढवून मिळावी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व ५९ जातींची भूमिका जाणून घेण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली.

या लॉग मार्चमध्ये कंत्राटी नोकरभरती, खासगीकरण आणि जातनिहाय जनगणना या मुद्द्यांवरही सरकारला जाब विचारला जाईल. हा लढा कोणत्याही विशिष्ट समाजाच्या विरोधात नसून संविधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेला सिद्धार्थ शिनगारे, अजय सरवदे, अॅड. राजेश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande