
नांदेड, 09 जून (हिं.स.)। लोहा येथील कै. बाळाजी पाटील पवार मंगल कार्यालयात आयोजित 'धोंडे जेवण' कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. याप्रसंगी लोहा शहराला 'हरित शहर' करण्याचा १ लाख ५१ हजार वृक्षारोपणाचा संकल्प व्यक्त केला.
वृक्ष हेच जीवनाचे आधार आहेत. केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. हा उपक्रम शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि प्रत्येक घरासमोर राबवून ती एक लोकचळवळ बनवण्याचे आवाहन मी नागरिकांना केले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल. यावेळी माजी आमदार सर्वश्री ओमप्रकाश पोकर्णा, मोहनराव हंबर्डे, सुभाष साबणे, प्रविण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार आणि उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis