छ.संभाजीनगर : आ. संजना जाधव यांचा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
छत्रपती संभाजीनगर, 09 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, कन्नडच्या आमदार संजना जाधव यांना मोठा धक्का बसला आहे. छाननीदरम्यान आ. संजना
छ.संभाजीनगर : आ. संजना जाधव यांचा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद


छत्रपती संभाजीनगर, 09 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, कन्नडच्या आमदार संजना जाधव यांना मोठा धक्का बसला आहे. छाननीदरम्यान आ. संजना जाधव यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले आहे. अर्ज बाद होण्यामागील कारणांची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी या निर्णयाचा निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून पुढील हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande