कोल्हापूरच्या अक्षय ढेरेला आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
कोल्हापूर, 09 जून (हिं.स.) : कागल तालुक्यातील एकोंडी येथील पैलवान अक्षय तानाजी ढेरे याने व्हिएतनाम येथे झालेल्या अंडर-23 सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत 57 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरा
पै. अक्षय ढेरेचा खा.  महाडिक यांच्याकडून सन्मान


कोल्हापूर, 09 जून (हिं.स.) : कागल तालुक्यातील एकोंडी येथील पैलवान अक्षय तानाजी ढेरे याने व्हिएतनाम येथे झालेल्या अंडर-23 सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत 57 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा उंचावत अक्षयने कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. कठीण परिस्थितीतही सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी अक्षय ढेरेचा सन्मान करत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा देत महाडिक कुटुंबीय नेहमी पाठीशी राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी संभाजी शिंदे, असिफ मुल्लाणी, तानाजी ढेरे, वस्ताद बाळासो राजगिरे, मार्गदर्शक युवराज पाटील, सागर मगदूम, रविंद्र कुंभार व मदन चौगुले उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande