नांदेड - जलशुद्धीकरण प्रकल्पाला महापौर व उपमहापौर यांनी दिली अचानक भेट
नांदेड, 09 जून (हिं.स.)। नांदेड शहरातील काबरा नगर येथील महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला महापौर कविता संतोष मुळे व उपमहापौर दीपकसिंह रावत यांनी अचानक भेट देत प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली. यावेळी जलशुद्धीकरण प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणाऱ्य
अ


नांदेड, 09 जून (हिं.स.)। नांदेड शहरातील काबरा नगर येथील महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला महापौर कविता संतोष मुळे व उपमहापौर दीपकसिंह रावत यांनी अचानक भेट देत प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली.

यावेळी जलशुद्धीकरण प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व उपकरणांची माहिती घेत त्यांच्या देखभाल व देखरेखीचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रकल्प परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक बाबीकडे नांदेड महानगरपालिका प्रशासन गंभीरतेने लक्ष देत असून, उत्तम सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande