रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दोन ते तीन दिवसांत बैठक;गिरीश महाजन यांचे आश्वासन
गवळवाडी व बाधित शेतकऱ्यांमध्ये कोणताही वाद नाही;अधिकृत बैठकीनंतर पुढील आंदोलनाचा निर्णय नाशिक, 09 जून (हिं.स.) : रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर आज मुंबई नाका येथ
Meeting in two to three days


गवळवाडी व बाधित शेतकऱ्यांमध्ये कोणताही वाद नाही;अधिकृत बैठकीनंतर पुढील आंदोलनाचा निर्णय

नाशिक, 09 जून (हिं.स.) : रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर आज मुंबई नाका येथील छावा क्रांतिवीर सेनेच्या संपर्क कार्यालयात छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर यांच्या उपस्थितीत रिंग रोड बाधित गावांतील प्रमुख शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.बैठकीत कालच्या घटनाक्रमाचा आढावा घेण्यात आला तसेच पुढील आंदोलनाची दिशा व रूपरेषा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.यावेळी रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या भावना,तक्रारी आणि मागण्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या.यावर गिरीश महाजन यांनी दोन ते तीन दिवसांत प्रशासन,लोकप्रतिनिधी आणि रिंग रोड बाधित शेतकरी यांची अधिकृत बैठक आयोजित करण्यासाठी वेळ निश्चित करण्यात येईल आणि चर्चेच्या माध्यमातून या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल,असे आश्वासन दिले.तब्येत ठीक नसल्याने तसेच मुंबई येथे महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त असल्यामुळे कालच्या बैठकीस उपस्थित राहता आले नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेत कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेत सर्वांना न्याय देणारा मध्यम मार्ग काढण्याचा शब्दही त्यांनी दिला.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान,काही वृत्तपत्रांमध्ये रिंग रोडवरून दोन गावांत वाद''अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.त्याबाबत स्पष्टीकरण देताना करण गायकर यांनी सांगितले की,गवळवाडी आणि रिंग रोड बाधित शेतकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद झालेला नाही.तसेच गवळवाडी परिसरातील कोणताही शेतकरी संबंधित बैठकीत उपस्थित नव्हता. त्यामुळे गवळवाडी आणि बाधित शेतकरी यांच्यात संघर्ष झाल्याचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही.उलट गवळवाडीमार्गे पर्यायी रस्ता व्हावा यासाठी त्या परिसरातील शेतकरी पूर्वीपासून प्रयत्नशील आहेत.शासनाने या पर्यायी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा,अशीच त्या भागातील शेतकऱ्यांची भूमिका आहे.काल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद विविध अलाईनमेंटचे पर्याय समजावून सांगत असताना दोन गावांतील समोरासमोर रस्त्याला लागून असलेल्या काही शेतकऱ्यांमध्ये तांत्रिक बाबींबाबत गैरसमज निर्माण झाला होता.काही शेतकऱ्यांना एका बाजूची अलाईनमेंट बदलून दुसऱ्या बाजूने रस्ता नेला जात असल्याचा समज झाल्याने त्यांनी प्रश्न उपस्थित केले.मात्र संपूर्ण माहिती समजून घेतल्यानंतर हा गैरसमज दूर झाला.हा कोणत्याही दोन गावांमधील वाद नव्हता,तर माहितीच्या अपुऱ्या आकलनामुळे निर्माण झालेला क्षणिक गैरसमज होता.त्यामुळे गवळवाडी आणि रिंग रोड बाधित शेतकऱ्यांमध्ये कोणतेही मतभेद किंवा संघर्ष नसून सर्व शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने लढत आहेत.आजच्या बैठकीत उपस्थित सर्व गावांतील प्रमुख शेतकऱ्यांनी एकमताने निर्णय घेतला की,शासनाकडून पुढील दोन दिवसांत अधिकृत बैठकीचे निमंत्रण येण्याची प्रतीक्षा करण्यात येईल.त्यानंतरही प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत तर पुढील आंदोलनाची दिशा व स्वरूप याबाबत सामूहिक निर्णय घेतला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande