परभणी - हिंगोली स्थानिक प्राधिकार निवडणुकीसंदर्भात उमेदवार/प्रतिनिधींची बैठक संपन्न
परभणी, 09 जून, (हिं.स.)। महाराष्ट्र विधान परिषदेची परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार निवडणुकीसंदर्भात उमेदवार/प्रतिनिधींची बैठक संपन्न; प्रशासनाकडून सविस्तर मार्गदर्शन


परभणी, 09 जून, (हिं.स.)। महाराष्ट्र विधान परिषदेची परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न आली. बैठकीस उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व नियमबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे, प्रचारादरम्यान संयम राखणे, मतदान प्रक्रियेस सहकार्य करणे तसेच निवडणुकीशी संबंधित विविध नियम व तरतुदींचे पालन करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा ढालकरी यांनी उमेदवार व प्रतिनिधींना निवडणुकीतील प्रशासकीय बाबी, आवश्यक कागदपत्रे, मतदान केंद्रांवरील व्यवस्था तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी मतदान प्रक्रियेसंदर्भातील तांत्रिक बाबी, निवडणूक साहित्याचा वापर तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्याबाबत उमेदवारांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande