पुणे महापालिकेचा ठेकेदारांना इशारा; काम पूर्ण करा, अन्यथा होणार कारवाई
पुणे, 09 जून (हिं.स.) रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी), डिझेल, खडी आणि इतर बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या दरांमुळे पुणे शहरातील सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामांवर परिणाम होत असून ठेकेदारांनी महापालिकेकडे वाढीव निधीची मागणी केली आहे. मात्र, या मागणीला
pmc


पुणे, 09 जून (हिं.स.) रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी), डिझेल, खडी आणि इतर बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या दरांमुळे पुणे शहरातील सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामांवर परिणाम होत असून ठेकेदारांनी महापालिकेकडे वाढीव निधीची मागणी केली आहे. मात्र, या मागणीला महापालिका प्रशासनाने स्पष्ट नकार देत कामे नियोजित खर्चात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.महापालिकेतर्फे शहरात सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीची सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे सुरू आहेत. अशा कामांना ‘भाववाढ सूत्र’ लागू होत नसल्याने साहित्याच्या किंमती वाढल्या तरी ठेकेदारांना मंजूर दरातच काम पूर्ण करावे लागणार आहे. काम अपूर्ण ठेवल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.दरम्यान, शहरातील बेकायदा आरएमसी प्लांटविरोधातील कारवाईच्या निषेधार्थ प्लांट चालकांनी आंदोलन छेडले होते. आंदोलन मागे घेतल्यानंतर आरएमसी उत्पादकांनी प्रत्येक घनमीटरमागे सुमारे अडीच हजार रुपयांनी काँक्रिटचे दर वाढविल्याचा दावा ठेकेदारांनी केला आहे.याशिवाय अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे सात रुपयांची वाढ झाल्याने वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. परिणामी खडी, मुरूम आणि इतर बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने रस्ते प्रकल्पांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.ठेकेदारांच्या मते, ज्या अंदाजित खर्चात १०० टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित होते, त्या निधीत केवळ ६० ते ८० टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित कामांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी महापालिकेसमोर मांडले आहे.यासंदर्भात पथ विभागासोबत बैठकही झाली. मात्र, कमी कालावधीच्या कामांना भाववाढ सूत्र लागू होत नसल्याने अतिरिक्त निधी देणे शक्य नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ठेकेदार आणि प्रशासन यांच्यातील हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande