
दिंडोरी, 9 जून, (हिं.स.)। शासनाच्या आदेशानुसार कचर्यावर प्रकिया करण्यासाठी नागरिकांना ओला व सुका कचरा तसेच घातक कचरा वेगवेगळा देण्याबाबत दिंडोरी नगरपंचायत कर्मचा-यामार्फत शहरातील मुख्य बाजारपेठेत प्लास्टीक बंदी मोहीम राबविण्यात आली.
दिंडोरी नगरपंचायत मार्फत शहरात कचरा संकलन करून कचरा व्यवस्थापन केंद्र येथे विलगीकरण करून प्रकिया केली जाते. नगरपंचायतीच्या मार्फत सूचना वेळोवेळी देण्यात येत असतात. मुख्याधिकारी संदिप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मु्ख्य बाजारपेठत प्लास्टीक बंदि मोहीम राबविण्यात आली. प्रथम शास्ती प्रत्येकी 5000 रुपये दंड नगरपंचायत मार्फत आकारण्यात आला. एकुण 10000 रुपये दंड वसुल करण्यात आला. याकामी स्वच्छता निरीक्षक महेंद्र कांदळकर, दीपक सोळंकी, कमलाकर गांगुर्डे, नरेंद्र पगारे यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV