परभणीत गुटखा व अंमलीपदार्थांविरोधी मोहिम; 839 कारवायांत मुद्देमाल जप्त
परभणी, 09 जून (हिं.स.) : नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या गुटखा व अमलीपदार्थ विरोधी मोहिमेत परभणी जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 839 कारवायांमध्ये 12 लाख 64
पोलीस उपहानिरीक्षक पथकाच्या परभणीत धाडी  -१२ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


परभणी, 09 जून (हिं.स.) : नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या गुटखा व अमलीपदार्थ विरोधी मोहिमेत परभणी जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 839 कारवायांमध्ये 12 लाख 64 हजार 43 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 14 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

या मोहिमेदरम्यान पानटपऱ्यांची व्यापक तपासणी करण्यात आली असून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मागील आठवड्यात एकूण 2,702 पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली असून अमली पदार्थ साठवणुकीची संभाव्य ठिकाणेही तपासली जात आहेत.

या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना द्यावी, यासाठी “खबर” हेल्पलाइन क्रमांक 9150100100 जारी करण्यात आला आहे. या हेल्पलाइनवर परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती देण्याचे आवाहन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप यांनी केले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande