मान्सूनपूर्व पावसाने मांजरा धरणात ९.६९७ दलघमी पाण्याची वाढ
बीड, 9 जून, (हिं.स.)। लातूर, अंबाजोगाई, केज, कळंब व धारूर या शहरांसह शेकडो गावांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविणारे तसेच पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात मान्सूनपूर्व पावसामुळे लक्षणी
मान्सूनपूर्व पावसाने मांजरा धरणात ९.६९७ दलघमी पाण्याची वाढ


बीड, 9 जून, (हिं.स.)। लातूर, अंबाजोगाई, केज, कळंब व धारूर या शहरांसह शेकडो गावांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविणारे तसेच पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात मान्सूनपूर्व पावसामुळे लक्षणीय वाढ झाली आहे.

केज व कळंब तालुक्यासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाले खळखळून वाहू लागले. त्यामुळे मांजरा धरणात दखलपात्र पाण्याची आवक झाली असून धरणाच्या पाणीसाठ्यात ९.६९७ दलघमी वाढ नोंदविण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातील हा पहिलाच येवा आहे.

मांजरा धरणाची एकूण साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे धरणात ७७.८८९ दलघमी एवढा उपयुक्त पाणीसाठा होता. झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन उपयुक्त पाणीसाठा ८७.५८६ दलघमी इतका झाला असून तो एकूण क्षमतेच्या २२.८६ टक्के आहे. मृतसाठा वगळता एका दिवसात ९.६९७ दलघमी पाणीसाठा वाढला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande