अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनांच्या मदतीने पुणे आरटीओची मोहीम
पुणे, 09 जून (हिं.स.) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ‘रडार’ यंत्रणेच्या माध्यमातून मोठी कारवाई केली आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल ६४ हजार ३१० वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी सर्वा
rto


पुणे, 09 जून (हिं.स.) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ‘रडार’ यंत्रणेच्या माध्यमातून मोठी कारवाई केली आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल ६४ हजार ३१० वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी सर्वाधिक कारवाई विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर झाली आहे.पुणे आरटीओकडे सध्या आठ अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहने असून त्यांच्या छतावर ‘रडार’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेच्या साहाय्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची नोंद घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाते. १ डिसेंबर २०२५ पासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून ८ जून २०२६ पर्यंतच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.आरटीओच्या आकडेवारीनुसार एकूण कारवाईपैकी ८५.७० टक्के कारवाई विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर झाली आहे. ही संख्या चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. याशिवाय प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र (पीयूसी) नसलेल्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली असून ३ हजार १०३ वाहनधारकांकडे पीयूसी नसल्याचे आढळून आले.याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी सांगितले की, रडार अहवालातील आकडेवारीनुसार विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांची संख्या गंभीर आहे. अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनांच्या मदतीने नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे.नागरिकांनी केवळ दंडाच्या भीतीने नव्हे, तर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande