
छत्रपती संभाजीनगर, 09 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, या प्रक्रियेत सिल्लोडचे नगराध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांना मोठा धक्का बसला आहे. छाननी दरम्यान समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. अर्ज बाद होण्यामागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झाले नसले तरी या निर्णयामुळे संबंधित गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून पुढील घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis