परळीत खेत बचाव अभियान; जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
बीड, 09 जून, (हिं.स.)। तालुका कृषी अधिकारी कार्यालय, परळी वै. येथे खेत बचाव अभियान आणि किसान गोष्टी अंतर्गत भव्य शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका कृषी अधिकारी डॉ. अर्चना नागरगोजे यांच्या नियोजनाखाली झालेल्या या कार्यक्र
परळीत खेत बचाव अभियान; जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन


बीड, 09 जून, (हिं.स.)। तालुका कृषी अधिकारी कार्यालय, परळी वै. येथे खेत बचाव अभियान आणि किसान गोष्टी अंतर्गत भव्य शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका कृषी अधिकारी डॉ. अर्चना नागरगोजे यांच्या नियोजनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. निसर्गाच्या लहरीपणावर आणि येणाऱ्या संकटांवर योग्य नियोजनातून मात करून शेतकऱ्यांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ पंखे यांनी प्रास्ताविकातून शेतकऱ्यांना 'एल निनो'च्या संभाव्य धोक्यांबद्दल जागरूक केले. त्यांनी कमी पाऊसमानाचा विचार करून सरी व वरंबा पद्धत, बीजप्रक्रिया आणि घरगुती बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करण्याचा सल्ला दिला. जमिनीत किमान १०० मिमी पाऊस झाल्यावरच कमी कालावधीच्या पिकांची निवड करण्याचे त्यांनी सुचवले.

त्यानंतर उप कृषी अधिकारी ए. जी. गाडे यांनी एकात्मिक शेती व्यवस्थापन, हुमणी अळी नियंत्रण, सापळा पिके, आंतरपिके, चिकट व प्रकाश सापळ्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी निंबोळी व दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत सांगत, आर्थिक नुकसान पातळीनुसार रासायनिक औषधांची लेबल क्लेमप्रमाणे फवारणी कशी करावी, यावर प्रकाश टाकला.

या सोहळ्याला भा.प्र.से. प्रशिक्षणार्थी अधिकारी गुप्ता, अतिरिक्त जिल्हाधिकारी धार्मिक यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात पोकरा समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी सोयाबीन बीजप्रक्रिया आणि घरगुती बियाणे उगवण क्षमतेचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच काही शेतकरी गटांनी दशपर्णी अर्क व जीवामृताचे प्रात्यक्षिक सादर करत त्याचे महत्त्व पटवून दिले. याच वेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande