सोलापूर शहरात २३ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
शस्त्रे, मिरवणुका आणि फटाक्यांवर बंदी सोलापूर, 09 जून (हिं.स.)। सोलापूर शहरातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीत ९ जून २०२६ रोजी पहाटे १२.०१ वाजल्यापासून २३ जून २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत
Cp


शस्त्रे, मिरवणुका आणि फटाक्यांवर बंदी सोलापूर, 09 जून (हिं.स.)। सोलापूर शहरातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीत ९ जून २०२६ रोजी पहाटे १२.०१ वाजल्यापासून २३ जून २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशेष शाखा) अश्विनी पाटील यांच्या आदेशानुसार हे निर्बंध लागू राहणार आहेत.

या आदेशानुसार तलवारी, भाले, दंडुके, काठ्या, लाठ्या, चाकू, अग्निशस्त्रे तसेच शारीरिक इजा पोहोचविण्यास वापरता येतील अशी कोणतीही शस्त्रे बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. परवानाधारक शस्त्रधारकांना अथवा सक्षम प्राधिकाऱ्यांची विशेष परवानगी असलेल्यांना यामधून सूट देण्यात आली आहे.तसेच स्फोटके, दगड, क्षेपणास्त्रे किंवा अशा स्वरूपाच्या वस्तूंची वाहतूक, साठवणूक अथवा निर्मिती करण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती, प्रेत, आकृती किंवा पुतळ्यांचे प्रदर्शन, आक्षेपार्ह घोषणाबाजी, गाणी किंवा संगीत वाजविण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस प्रशासनाच्या मते सामाजिक नैतिकता, सार्वजनिक शिष्टाचार किंवा राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर साहित्य तयार करणे, प्रदर्शित करणे अथवा प्रसारित करणे यावरही बंदी असेल.दरम्यान, महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७ (३) नुसार शहरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोणतीही मिरवणूक काढणे तसेच मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर, बँड, वाद्ये आणि फटाक्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande