धारूरमध्ये एकल महिलांसाठी आरोग्य शिबिर; ७० महिलांची तपासणी
बीड, 09 जून, (हिं.स.)। मनस्विनी महिला विकास सेवाभावी संस्था, अंबाजोगाईच्या वतीने धारूर येथे एकल महिलांसाठी आरोग्य शिबिर व मार्गदर्शन पार पडले. एकल महिलांच्या आरोग्याच्या समस्या, त्यांचे हक्क व स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात आल
धारूरमध्ये एकल महिलांसाठी आरोग्य शिबिर; ७० महिलांची तपासणी


बीड, 09 जून, (हिं.स.)। मनस्विनी महिला विकास सेवाभावी संस्था, अंबाजोगाईच्या वतीने धारूर येथे एकल महिलांसाठी आरोग्य शिबिर व मार्गदर्शन पार पडले. एकल महिलांच्या आरोग्याच्या समस्या, त्यांचे हक्क व स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात ७० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. रमा पांडे यांनी महिलांशी संवाद साधत एकल महिलांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्यांचा लाभघेण्याची प्रक्रिया याबाबत माहिती दिली. तालुका आरोग्य विभागाचे समुपदेशक प्रेमानंद स्वामी यांनी क्षयरोग (टीबी), व्यसनाधीनता, गुप्तरोग, गर्भाशयाशी संबंधित आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांवर माहिती दिली. शहर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. खडसे यांनी आरोग्य पथकासह उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande