
परभणी, 09 जून (हिं.स.) सेलू येथील श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील महेश नगर परिसरातील भक्तितीर्थ साई मंदिर येथे कथा प्रवक्ता, वेदशास्त्रसंपन्न हभप श्रीपद्मनाभ महाराज व्यास (धाराशीव) यांच्या प्रासादिक वाणीतून श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कथा शनिवार 13 जून ते गुरुवार 18 जून या कालावधीत दररोज दुपारी 3 ते 6 या वेळेत होणार आहे. श्रीमद्भागवत कथेमधून भक्ती, अध्यात्म आणि जीवनमूल्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. कथेचा समारोप शुक्रवार 19 जून रोजी होणार असून सकाळी 7.30 वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून कथा स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9 ते 12 या वेळेत कथेचा समारोपाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीमद्भागवत कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसुधा मनोहर कुलकर्णी, मीना व शशिकांत कुलकर्णी, सुनंदा व शरद कुलकर्णी, वैशाली व राहुल कुलकर्णी, दीप्ती व अतुल कुलकर्णी, इशिता कुलकर्णी तसेच शाश्वत कुलकर्णी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis