लातूरमध्ये वाहतूक पोलिस निलंबित
लातूर, 09 जून (हिं.स.) : मिनी मार्केट परिसरात घडलेल्या घटनेनंतर वाहतूक नियंत्रण शाखेतील एका पोलीस अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मिनी मार्केट येथे वाहतूक नियंत्रण शाखेतील अंमलदार (पोकॉ/820) शरद कांदे हे वाहतूक नियमनासाठी 7 जून 2026
पोलीस निलंबन


लातूर, 09 जून (हिं.स.) : मिनी मार्केट परिसरात घडलेल्या घटनेनंतर वाहतूक नियंत्रण शाखेतील एका पोलीस अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मिनी मार्केट येथे वाहतूक नियंत्रण शाखेतील अंमलदार (पोकॉ/820) शरद कांदे हे वाहतूक नियमनासाठी 7 जून 2026 रोजी कार्यरत असताना, एका दुचाकीस्वारास चुकीच्या पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान संबंधित दुचाकीस्वार पडल्याची घटना घडली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

चौकशी अहवालात पोलीस अंमलदार शरद कांदे यांच्याकडून कसुरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande