परभणी जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
परभणी, 09 जून (हिं.स.) : परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात आज वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख
जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात वृक्षारोपण


परभणी, 09 जून (हिं.स.) : परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात आज वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. सादराणी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस. टी. अडकीने, सचिव तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे भूषण म. काळे, तसेच जिल्ह्यातील इतर न्यायिक अधिकारी उपस्थित होते.

याशिवाय जिल्हा सरकारी वकील, लोक अभिरक्षक कार्यालयातील विधिज्ञ, जिल्हा न्यायालयातील कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमात उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी केवळ वृक्षारोपणच नव्हे तर वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही सर्वांनी स्वीकारण्याचा संकल्प व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande