
रत्नागिरी, 8 जून, (हिं.स.) । कुर्धे (ता. रत्नागिरी) येथे पऱ्यावर बांधण्यात आलेल्या स्लॅबच्या साकवाखाली काम करत असताना स्लॅब अंगावर कोसळून २७ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (९ जून) दुपारी सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश शिवाजी काटे (वय २७, रा. शांतीनगर, रत्नागिरी) हा कुर्धे येथील लिंगायत वाडी आणि खोताची वाडी दरम्यान पऱ्यावरील पाखाडीच्या कामासाठी गेला होता. सोमवारी पडलेल्या पावसामुळे पऱ्यावर टाकलेल्या पाखाडीचा काही भाग वाहून गेला होता. मंगळवारी सकाळी आकाश इतर कामगारांसह पऱ्यात उतरून साकवाच्या कामाला लागला होता. अचानक साकवाचा स्लॅब कोसळला आणि आकाश त्याखाली गाडला गेला. पऱ्यामध्ये पाणी असल्याने आकाशला शोधण्यात अडथळे निर्माण झाले होते. अखेरीस जेसीबीच्या साह्याने सर्व ढिगारा बाहेर काढण्यात आला आणि आकाशला देखील बाहेर काढण्यात आले. त्यात तत्काळ जिल्हा रुग्णालय हलवण्यात आले, मात्र तो आधी स्मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी