नाशिक - मॉडर्न एज्युकेशन सोसायटीत शिक्षकांसाठी कार्यशाळा संपन्न
नाशिक, 09 जून (हिं.स.)। येथील मॉडेल एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मिडीयम स्कूल सिडको, अशोक नगर येथील सर्व शिक्षकांसाठी कार्यशाळा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय कार्यशाळेसाठी सौ.साक्षी ठाकूरेल,.मोहित पुरोहित, रवींद्र माणके
नाशिक - मॉडर्न एज्युकेशन सोसायटीत शिक्षकांसाठी कार्यशाळा संपन्न


नाशिक, 09 जून (हिं.स.)। येथील मॉडेल एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मिडीयम स्कूल सिडको, अशोक नगर येथील सर्व शिक्षकांसाठी कार्यशाळा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय कार्यशाळेसाठी सौ.साक्षी ठाकूरेल,.मोहित पुरोहित, रवींद्र माणके यांनी अनुक्रमे तीन दिवसीय मार्गदर्शन केले.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविताना आजची शैक्षणिक परिस्थिती व गरजा पाहता विद्यार्थ्यांची रुची कशी वाढवावी, तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, पूर्वतयारी कशी करावी, पालकांशी तुम्ही हितगुज कसे ठेवावे, आपला शिक्षक म्हणून एटीट्यूड व अभ्यास आणि एकंदरच सर्व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपण काय करावे, यासंदर्भात आणि सिस्टम्स या संदर्भात सर्वांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी शालेय समितीचे चेअरमन वसंत खैरनार, नितीन राका, उत्तमराव विधाते तसेच चारही विभागाच्या मुख्याध्यापिका सौ साक्षी ठाकुरेल, सौ. सुचिता कुलकर्णी, सौ.रेणू जोशी, सौ.सारिका चौधरी तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande