रत्नागिरी - आपत्कालीन स्थितीत संपर्क साधण्यासाठी क्रमांक जाहीर
रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) | पावसाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाळ्यात पूर,दरड कोसळणे, वीज खंडित होणे किंवा इतर कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने मदतीसाठी
रत्नागिरी - आपत्कालीन स्थितीत संपर्क साधण्यासाठी क्रमांक जाहीर


रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) | पावसाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाळ्यात पूर,दरड कोसळणे, वीज खंडित होणे किंवा इतर कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने मदतीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी आणि आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. ते असे :

जिल्हा स्तरावरील आपत्कालीन संपर्क क्रमांक -

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष : 02352-222233 /7057222233

जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष : 02352-222222 / 112 (टोल फ्री)

महावितरण (वीज तक्रारी) : 7875765018

वन विभाग, रत्नागिरी : 9096578761 / 1926

सार्वजनिक बांधकाम विभाग : 02352-223505

जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी : 02352-223570

तालुकानिहाय तहसील कार्यालयांचे संपर्क क्रमांक :

रत्नागिरी: 02352-223127

लांजा: 02351-230024 / 8087624324

राजापूर: 02353-222027

संगमेश्वर: 02354-260024

चिपळूण: 02355-252044 / 9673252044

खेड: 02356-263031

दापोली: 02358-282036

गुहागर: 02359-240237

मंडणगड: 02350-225236

कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande