सोलापूर-मोहरम कमिटीच्या अध्यक्षपदावरून संघर्ष; दोन्ही गटांना वर्गणी संकलनास मनाई
सोलापूर, 09 जून (हिं.स.)सोलापूर शहरातील मोहरम कमिटीच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादामुळे वर्गणी संकलनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अध्यक्षपदाचा अधिकार नसताना वर्गणी गोळा केली जात असल्याच्या तक्रारीनंतर जेलरोड पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गट
सोलापूर-मोहरम कमिटीच्या अध्यक्षपदावरून संघर्ष; दोन्ही गटांना वर्गणी संकलनास मनाई


सोलापूर, 09 जून (हिं.स.)सोलापूर शहरातील मोहरम कमिटीच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादामुळे वर्गणी संकलनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अध्यक्षपदाचा अधिकार नसताना वर्गणी गोळा केली जात असल्याच्या तक्रारीनंतर जेलरोड पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना वर्गणी संकलन न करण्याचे निर्देश दिले आहेत.सोलापूर शहरात दरवर्षी मोहरम उत्साहात साजरा केला जातो. या काळात पंजांच्या (सवारी) मिरवणुका काढल्या जातात आणि उत्सवाच्या आयोजनासाठी मुस्लिम समाजाकडून वर्गणी संकलित केली जाते. मात्र, मकबूल मोहोळकर हे अधिकृत अधिकार नसताना मोहरम कमिटीचे पदाधिकारी असल्याचे सांगून वर्गणी गोळा करीत असल्याची तक्रार मुसा मुर्शद यांनी जेलरोड पोलिसांकडे केली होती.तक्रारीची दखल घेत जेलरोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राचप्पा चानकोटी यांनी चौकशी सुरू केली. यासंदर्भात जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सध्या मोहरम कमिटीचे अधिकृत अध्यक्ष कोण आहेत, याची माहिती मागविण्यात आली.या पत्राला उत्तर देताना जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी मोहरम कमिटीचे अध्यक्षपद कोणालाही अधिकृतरित्या देण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले. वक्फ विभागाच्या या भूमिकेनंतर पोलिसांनी संबंधित पत्राची प्रत दोन्ही पक्षांना पाठवून कोणत्याही प्रकारची वर्गणी गोळा करू नये, असे निर्देश दिले आहेत.अधिकार नसताना वर्गणी संकलन केल्यास त्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर खंडणीसह अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे यंदाच्या मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कमिटीच्या वैधतेचा प्रश्न अधिक चर्चेत आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande