
नांदेड, 09 जून (हिं.स.) : लोहा बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरातून सुरू असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स, काळी-पिवळी वाहने तसेच इतर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी एसटी महामंडळ आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम सुरू केली आहे.
लोहा बसस्थानक परिसरातील वाहतूक शिस्त राखणे, प्रवाशांची गैरसोय टाळणे आणि एसटी सेवेला अडथळा निर्माण करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासनाच्या या कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis