लातूर - अतनूर आरोग्य केंद्र व उपकेंद्राची जिल्हास्तरीय समुहाने केली स्थळ पाहणी
लातूर, 01 जुलै (हिं.स.)। जळकोट तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगरी भागात असलेल्या अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच उपकेंद्रासह, पल्स पोलिओ लसीकरण ठिकाणी जिल्हास्तरीय समुहाच्या टीमने स्थळ पाहणी व तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर येथे व केंद्रांतर्ग
आरोग्य केंद्राची तपासणी


लातूर, 01 जुलै (हिं.स.)। जळकोट तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगरी भागात असलेल्या अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच उपकेंद्रासह, पल्स पोलिओ लसीकरण ठिकाणी जिल्हास्तरीय समुहाच्या टीमने स्थळ पाहणी व तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर येथे व केंद्रांतर्गत ५ उपकेंद्र अतनूर, गव्हाण, गुत्ती, घोणसी, तिरुका, माळीहिप्परगा येथे जिल्हा सांख्यिकी अधिकारी शेख अफजल शेख यांच्या 'टीम कडून पाहणी' केली. पाहणी करताना तेथील एखाद्या कामाच्या, समस्येच्या किंवा जागेच्या योग्य स्थितीची खात्री करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या समूहाने (टीमने) केलेली प्रत्यक्ष पाहणी होती. तसेच सदरील कामाची गुणवत्ता तपासणे, समस्या सोडवणे किंवा नवीन प्रकल्पाचा आढावा घेणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. यात खालील गोष्टींचा समावेश होता. तपासणी वेळी कामाची अचूकता आणि गुणवत्तेची पडताळणी करून स्थळ पाहणी वेळी प्रत्यक्ष जागेवर जाऊन भौगोलिक किंवा प्रत्यक्ष स्थितीची नोंद घेतली. पाहणीनंतर समुह टीमकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा संबंधित विभागाला अहवाल सादर केला जाणार आहे. समुहाने सर्व बूथ ची पाहणी केली. यावेळी अतनूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सकलन शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती कोळ्ळे, आरोग्य निरीक्षक सलमान शेख, रोखपाल तथा वरिष्ठ लिपिक पांडुरंग सूर्यवंशी, बालाजी सोनटक्के, आरोग्य सह्ययिका प्रेमिला म्हेत्रे सह संपूर्ण आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहायिका, परिचारिका, आरोग्य वृंद कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ते, आशा कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande