माजी आमदार डॉ. राजन साळवी उद्या अकोला दौऱ्यावर; शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक
अकोला, 01 जुलै (हिं.स.)। शिवसेनेचे माजी आमदार तथा अकोला लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. राजन साळवी उद्या, गुरुवार दिनांक २ जुलै रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना अकोला जिल्हा कार्यकारिणीची अत्यंत महत
Photo


अकोला, 01 जुलै (हिं.स.)।

शिवसेनेचे माजी आमदार तथा अकोला लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. राजन साळवी उद्या, गुरुवार दिनांक २ जुलै रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना अकोला जिल्हा कार्यकारिणीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा दौरा आणि बैठक अकोला येथील ठिकाण: कृषक भवन

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,परिसर मूर्तिजापूर रोड,अकोला.येथे पार पडणार आहे. गुरुवारी सकाळी ठीक ११:०० वाजता या बैठकीला सुरुवात होईल. आगामी काळातील पक्षाची रणनीती आणि 'नवीन जिल्हा कार्यकारिणी गठीत करणे व त्यासंबंधीची रचना' हा या बैठकीचा मुख्य विषय असणार आहे. पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

या बैठकीला शिवसेनेचे आजी-माजी जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहरप्रमुख यांच्यासह जिल्हास्तरीय महिला आघाडी, युवासेना आणि सर्व संलग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. तसेच जिल्हा स्तरावर सक्रीयपणे काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनीही या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी आमदार डॉ. राजन साळवी यांच्या या नियोजित अकोला दौऱ्याची आणि बैठकीची सविस्तर माहिती शिवसेना जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande