पुणे - स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा
पुणे, 01 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित कृषी दिन कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण 16 प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन
gfd


पुणे, 01 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित कृषी दिन कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण 16 प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती अमोल नलावडे, समाज कल्याण समिती सभापती जितेंद्र बडेकर, सार्वजनिक बांधकाम व आरोग्य समिती सभापती दिपाली हुलावळे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, सदस्य दिपाली गव्हाणे, रुपाली झेंडे, शीतल कांबळे, कृषी आयुक्तालयाचे विभागीय कृषी सहसंचालक संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधिकारी अजित पिसाळ, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. राजेंद्र वासनिक, कृषी उपसंचालक रोहन भोसले शेतकरी, महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाचे प्रशिक्षक हेमंत जगताप उपस्थित होते.

नलावडे म्हणाले, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लोकाभिमुख कामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेच्यावतीने काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी प्रकल्प, शाळांमध्ये कृषी दिन साजरा करण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात डॉक्टर आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत असून लाखो शेतकऱ्यांन त्याचा लाभ होत आहे.

उमेद अभियानाअंतर्गत जिल्ह्यात महिला बचत गटांना सुमारे 500 कोटी रुपयांचा निधींचे वाटप करण्यात आले आहे. संकट काळात बळीराजाच्या पाठीमागे भक्क्मपणे उभ राहण्याकरिता कृषी कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्यावतीने काम करण्यात येईल, या कार्यक्रमात करण्यात आलेल्या सूचनांबाबत सकारात्क विचार करण्यात येईल, असेही नलावडे म्हणाले.

बडेकर म्हणाले की , राज्याच्या जडणघडणीत शेतकऱ्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्यांना आधार देण्याकरिता त्यामुळे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्यावतीने जिल्ह्यात काम करण्यात येत आहे. कृषी क्षेत्रात विविध योजना व नाविन्यपूर्ण उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. येत्या काळात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्कार देण्याची सूचना यावेळी बडेकर यांनी केली.

काकडे म्हणाले, एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाच्यादृष्टीने हवेली तालुक्यात जलतारा प्रकल्पाची योजना राबविण्यात येत आहे. नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीच्या धर्तीवर जिल्ह्यात कंपनी स्थापन करण्याकरिता पुढाकार घ्यावा, असेही काकडे म्हणाले.

ठाकूर म्हणाले, एल निनोच्या वर्षात कृषी विभागाच्यावतीने वेळोवळी पीकनिहाय मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपुरक व्यवसाय करण्यावर भर द्यावा, असे आवाहन ठाकूर यांनी केले.

डॉ. वासनिक म्हणाले, पशुसंवर्धन विभागाला आता कृषीचा दर्जा प्राप्त झालेला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करत जिल्ह्यात कृषी पर्यटन सुरु करण्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी सूचना डॉ. वासनिक यांनी केली.

श्री.जगताप म्हणाले, महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाच्या संरक्षित शेती विषयावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात येत आहे, या प्रशिक्षणाचा रोजगार वाढीकरिता उपयुक्त असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जगताप यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande