रत्नागिरी : अहमदाबाद–मंगळुरू साप्ताहिक विशेष रेल्वेला जुलैअखेरपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी, 1 जुलै (हिं.स.) । अहमदाबाद जंक्शन–मंगळुरू जंक्शन–अहमदाबाद जंक्शन (साप्ताहिक) विशेष रेल्वेगाडी (क्रमांक 09424/09423) ची सेवा जुलै २०२६ अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सुधारित वेळापत्रकानुसार ही विशेष गाडी धावणार असून
रत्नागिरी : अहमदाबाद–मंगळुरू साप्ताहिक विशेष रेल्वेला जुलैअखेरपर्यंत मुदतवाढ


रत्नागिरी, 1 जुलै (हिं.स.) । अहमदाबाद जंक्शन–मंगळुरू जंक्शन–अहमदाबाद जंक्शन (साप्ताहिक) विशेष रेल्वेगाडी (क्रमांक 09424/09423) ची सेवा जुलै २०२६ अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सुधारित वेळापत्रकानुसार ही विशेष गाडी धावणार असून, अहमदाबाद ते रोहा आणि रोहा ते अहमदाबाद या दरम्यानच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

गाडी क्रमांक 09424 अहमदाबाद–मंगळुरू साप्ताहिक विशेष ही गाडी ३, १०, १७, २४ आणि ३१ जुलै २०२६ रोजी दर शुक्रवारी दुपारी ४.०० वाजता अहमदाबाद जंक्शन येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ९.०० वाजता मंगळुरू जंक्शन येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 09423 मंगळुरू–अहमदाबाद साप्ताहिक विशेष गाडी ४, ११, १८, २५ जुलै आणि १ ऑगस्ट २०२६ रोजी दर शनिवारी रात्री १०.३० वाजता मंगळुरू जंक्शन येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २.१५ वाजता अहमदाबाद जंक्शन येथे पोहोचेल.

कोकण रेल्वेमार्गावर ही विशेष गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड-बायंदूर (हॉल्ट), कुंदापूर, उडुपी, मुल्की आणि सुरतकल या स्थानकांवर थांबा घेईल. या विशेष गाडीमध्ये एकूण २२ डबे असतील. त्यामध्ये २ एसी द्वितीय श्रेणी, ४ एसी तृतीय श्रेणी, १२ शयनयान, २ सामान्य आणि २ एसएलआर डब्यांचा समावेश आहे. या विशेष गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande