खासदार अनुप धोत्रे यांचे प्रयत्न व पाठपुराव्याने अकोला येथे केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी मार्ग प्रशस्त.....
अकोला, 01 जुलै (हिं.स.)। अकोला येथे केंद्रीय विद्द्यालय निर्माण करण्याचा माजी केंद्रीय राज्य मंत्री मा. संजय भाऊ धोत्रे यांच्या शैक्षणिक विकासाच्या संकल्पाला मुर्त स्वरूप देण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांच्या केंद्र शासनाकडील प्रयत्नांमुळे , के
खासदार अनुप धोत्रे यांचे प्रयत्न व पाठपुराव्याने अकोला येथे केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी मार्ग प्रशस्त.....


अकोला, 01 जुलै (हिं.स.)।

अकोला येथे केंद्रीय विद्द्यालय निर्माण करण्याचा माजी केंद्रीय राज्य मंत्री मा. संजय भाऊ धोत्रे यांच्या शैक्षणिक विकासाच्या संकल्पाला मुर्त स्वरूप देण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांच्या केंद्र शासनाकडील प्रयत्नांमुळे , केंद्र शासनाच्या दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नवीन ८५ केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या मान्यता आदेशामध्ये अकोला येथील केंद्रीय विद्यालयाचा समावेश करून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे, अकोला येथे मंजूर करण्यात आलेल्या केंद्रीय विद्द्यालयाकरिता आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकरांच्या संयुक्त व समन्वयीन प्रयत्नांद्वारे राज्य सरकारने केंद्रीय महाविद्यालयाला गुडधी ता. जि.अकोला येथील गट क्रमांक १३३ अ/ब/क मधील २.०२ हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे, केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी केंद्रीय विद्यालय संगठन, नवी दिल्ली यांनी रितसर मान्यता दिलेल्या विद्यालयांना शासकीय जमीन भोगाधिकार मुल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने कब्जेहक्काने व भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने प्रदान करण्यासाठी राज्य शासनाच्या मा. मंत्रीमंडळाच्या दि. ९ एप्रिल २०२६ च्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेल्या निर्णयास अनुसरून जागा उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात आली, सदरील जागेचा आगाऊ ताबा देण्याच्या जिल्हाधिकारी अकोला यांनी निर्गमित केलेल्या आदेशामुळे विद्द्यालय स्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला आहे, केंद्रीय विदयालय संगठन, मुंबई यांचे केंद्रीय विदयालयाकरीता तात्पुरत्या स्वरुपात KVS च्या निकषानुसार सक्षम प्राधिकरणाकडून निरीक्षण करुन सुरक्षित इमारत उपलब्ध करुन देणेबाबत आली. केंद्रीय विदयालय उभारणी करीता मौजे गुडधी ता. अकोला येथील जमीन प्रदान करण्यात आली असली तरी सदरचे केंद्रीय विदयालय उभारणीचे कार्य पूर्ण होईपर्यंत केंद्रीय विदयालयाकरीता तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षित इमारत उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. याअनुषंगाने दिनांक ०२/०६/२०२६ रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा शहर (टाऊन) अकोला, हरिहरपेठ अकोला ची स्थळपाहणी करण्यात आली असून केंद्रीय विदयालयाचे प्रतिनिधी यांचेव्दारे सदरची शाळा प्राथमिक स्वरुपात त्यांना तात्पुरते केंद्रीय विदयालय सुरु करण्याकरीता योग्य असल्याचे सांगितले त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी यांनी उपरोक्त इमारतीमध्ये काही दुरुस्ती उदा. इमारतीचे टीन बदलणे, खोल्यांची रंगरंगोटी करणे, स्लॅब गळती बंद करणे, मुलांचे व मुर्तीचे स्वच्छतागृह दुरुस्त करणे, पाण्याची व्यवस्था करणे, इलेक्ट्रीक जोडणी करणे,

तसेच इतर अनुषंगिक दुरुस्ती करणे याबाबत जिल्हाधिकारी अकोला यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांना आदेशित करून त्यांच्यास्तरावरुन केंद्रीय विदयालयास उपलब्ध करुन दयावयाच्या इमारतीमध्ये १ महिन्याच्या मुदतीत आवश्यक त्या दुरुस्त्या करून देण्यासाठी सुचना केलेल्या आहेत.

माझी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांची इच्छापूर्ती खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर यांनी पूर्णत्वाकडे, नेण्याचा प्रयत्न सुरू केला असून मतदारांना दिलेल्या वचनपूर्तीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असून अकोले करांची अनेक दिवसाची मागणी पूर्ण होऊन सुविधा मिळण्यास मदत होणार आहे व माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांनी दिलेल्या अकोले करांना शब्दपूर्तीच्या दृष्टीने खासदार धोत्रे व आमदार सावरकर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कार्यरत असल्याचा प्रत्यय या निमित्ताने आला आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande