
छत्रपती संभाजीनगर, 01 जुलै (हिं.स.) : जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू झाली असून नगरसेवकांची बैठक घेण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील भाजप विभागीय कार्यालयात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी मतदार संपर्क, मतदान नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करत निवडणूक जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करण्याचे आवाहन केले. बैठकीत मंत्री अतुल सावे, माजी खासदार डॉ. भागवत कराड आणि महापौर समीर राजूरकर यांनीही मार्गदर्शन केले. संघटनेच्या बळावर निवडणुकीत यश मिळविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis