रत्नागिरी : देवरूख नगरपंचायतीच्या करवाढीबाबत गुरुवारी चर्चासत्र
रत्नागिरी, 1 जुलै (हिं.स.) । देवरूख नगरपंचायतीच्या कर वाढीवर चर्चा करण्यासाठी देवरूख नगरपंचायत हद्दीतील व्यापारी, नागरिकांसाठी गुरुवारी (दि. २ जुलै) चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. देवरूख येथील मराठा भवनात ही विशेष बैठक होणार आहे. देवरूख नगरपंचा
रत्नागिरी : देवरूख नगरपंचायतीच्या करवाढीबाबत गुरुवारी चर्चासत्र


रत्नागिरी, 1 जुलै (हिं.स.) । देवरूख नगरपंचायतीच्या कर वाढीवर चर्चा करण्यासाठी देवरूख नगरपंचायत हद्दीतील व्यापारी, नागरिकांसाठी गुरुवारी (दि. २ जुलै) चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. देवरूख येथील मराठा भवनात ही विशेष बैठक होणार आहे.

देवरूख नगरपंचायतीने नव्याने करण्यात आलेल्या वाढीव कर आकारणीमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. याच चिंतायुक्त मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बैठकीसाठी देवरूखचे नगरसेवक तथा गटनेते चंद्रकांत (बाळा) कामेरकर यांनी सर्व संघटना, संस्था पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक यांना निमंत्रण दिले आहे. नगरपंचायतीने केलेल्या करवाढीसंदर्भात सविस्तर चर्चा करून पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

देवरूख नगरपंचायतीच्या करवाढीचा बाजारपेठेतील व्यापारी, व्यावसायिक मालमत्ता, निवासी मालमत्ता, सर्वसामान्य नागरिक यांच्यावर परीणाम होणार आहे. याबाबत लोकशाही मार्गाने कोणती ठोस भूमिका घ्यावी, हे या चर्चेत ठरवले जाणार आहे. त्यामुळे नागरिक, व्यापाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande